सध्या राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सामान्य माणसांसोबतच अनेक राजकीय मंत्री नेतेदेखील या कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहेत. राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे ते अनेक लोकांच्या संपर्कात येत असल्याने या नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली. ती निगेटिव्ह आली, मात्र खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन व्हायचे ठरवल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करुन दिली.
आपल्याला एक महत्वाची माहिती शेअर करत आहे. एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे.” अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.
“माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना, अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत.” असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.
“मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या भावनेतून होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.” अशी ग्वाही अमोल कोल्हे यांनी दिली.
माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना. अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 8, 2020
त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालय मध्ये संपर्क करू शकता.
धन्यवाद.— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 8, 2020