पुणे : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या विषयावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यापासून, काही नावांवर फुली मारली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात एकनाथ खडसेंसोबत राजू शेट्टींचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. यावरून राजू शेट्टींनी राष्ट्रवादीवर टीका करत, “करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशारा दिला. त्यामुळे, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
या पार्श्वभूमीवर आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं असून, “त्यांच्या नाराजीबाबत मला काही म्हणायचं नाही. त्यांचे सहकार आणि शेतीच्या क्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊन, आम्ही राज्यपालांना दिलेल्या यादीत त्यांचं नाव घेतलं यावर आता राज्यपाल अंतिम निर्णय घेतील. मात्र मला आश्चर्य वाटतं, अशाप्रकारची विधाने कशी केली जातात. मी दिलेला शब्द पाळला आहे. आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे,” असं ते म्हणाले.
परप्रांतीयांना ओबीसीत आरक्षण दयायला भाजपचा विरोध?, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
शरद पवार पुण्यात कर्वेनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या कोनशिलेचं अनावरण करण्यासाठी आले होते. त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना पवारांनी शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य केलं. दरम्यान, “ठरलेला समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवायचं आहे, आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो,” असा हल्लाबोल शेट्टी यांनी केला होता.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक
दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या १२ सदस्यांच्या यादीत बदल केल्याचं वृत्त माध्यमांतून फिरत होते. तसेच, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेमंत टकले यांच्या नावाचा समावेश केला असल्याचे आणि राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले असल्याचे जवळजवळ पक्के झाले असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता शरद पवारांनी आज या सगळ्या प्रकरणावर आपले मौन सोडले असून, चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
Read Also :
- “आघाडीसोबत गेले आणि ‘काशी’ झाली, आता परत काढा आत्मक्लेश यात्रा”, खोतांचा शेट्टींना टोला
- …म्हणून वाझेने ‘अँटिलीया’बाहेर पार्क केली स्फोटकांची गाडी, NIA ने केले आरोपपत्र दाखल
- “पक्षात महिलांना डावललं जातं”, या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…
- “आम्ही खंजीर खुपसत नाही, थेट समोरून कोथळा काढतो” राऊतांचा घणाघाती हल्ला
- महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक, पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट