नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोना चा कहर सुरुच आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात काल दुपारपर्यंत तब्बल 369 नवे कोरोना बाधित आढळले होते. नाशिक शहरमधील 286, ग्रामीणमधील 70, तर मालेगावमधील 13 जणांचा यात समावेश आहे.
शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आज (24 जुलै) नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने स्वतः पवार मैदानात उतरल्याची चर्चा आहे.
एकीकडे स्वतः मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक आठवड्यापूर्वी दिली खरी, मात्र त्यानंतर शरद पवारांनी दौरा ठरवला, आखला आणि बैठक बोलावल्याचे चित्र आहे.