मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू आहेत. त्यामुळे आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्रं असतानाच काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच. के. पाटील यांनी काल शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत” – पी. चिदंबरम
यावेळी या तिन्ही नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरीवर चर्चा केली. तसेच, “पुढच्या सगळ्या पातळीवरच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असेल तर, त्याविषयी मी भाष्य करणे उचित होणार नाही, पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण यासंबंधीचे वक्तव्य करण्याचे अधिकार दिले असतील तर तसे सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही,” असं थेट मत त्यांनी यावेळी मांडलं आहे.
…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी केला खुलासा!
तसेच, “तुम्ही सगळ्या निवडणुका खरंच स्वबळावर लढणार आहात का? तुमचा असा निर्णय झाला असेल, तर सत्तेतील इतर पक्षांना तसे स्पष्ट सांगा,” या शब्दांत त्यांनी आपली नाराजी यावेळी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केल्याचे समजते आहे. दुसरीकडे गेल्या काही नाना पटोले यांच्या स्वबळावरच्या आणि परवाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे समजते आहे.
“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”
यावेळी, “पक्ष संघटना मजबूत आणि वाढवण्याच्या भाषेविषयी मनात कुठलीही शंका नाही. सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि तशी भाषा आणि दृष्टी असली देखील पाहिजे. मात्र, असे असताना सत्तेत सोबत असलेले पक्ष दुखावले जाणार नाहीत ना, त्यामुळे सरकारमध्ये कटुता येणार नाही ना, याकडे जाणीव पूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपले मत या नेत्यांपुढे मांडले असल्याचे वृत्त आहे.
Read Also :
- ”राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात, मात्र…” उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
- सुरेखा पुणेकर यांनी विनायक मेटे यांच्याकडे देगलूर पोटनिवडणुकीसाठी तिकीटाची मागणी
- ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका!
- एकनाथ खडसेंना अडकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सापळा रचला – प्रवीण दरेकर
- फडणवीस सरकारने दाबून ठेवलेला झोटिंग समिती अहवाल सापडला