राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली असून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी त्यांना बरं वाटत नसल्याने पुण्यातल्या सिंहगड रोड इथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते . उपचारानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. मात्र आज पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रूपाली चाकणकर गेल्या 15 दिवसांपूर्वी जालना दौऱ्यावर होत्या. जालना दौऱ्यावरून पुण्यात आल्यापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगण्यात येत होते . त्यांना डेंगुची लक्षणं जाणवत असल्याने तसेच त्यांना पेशी कमी जास्त होण्याचा त्रास होत असल्याने त्यांची प्रकृती बरी नव्हती.
दरम्यान, चाकणकर यांची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली आहे. मात्र कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला होता.