पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भोसरी विधानसभा मतदार संघाची धुरा ‘मॅनेजमेंट गुरू’ नगरसेवक अजित गव्हाणे यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतनंतर आता पुन्हा एकदा गव्हाणे यांचा ‘कार्यक्रम फेल’ झाला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत नगरसेवक अजित गव्हाणे यांनी भोसरी मतदार संघामध्ये ४ कोटी रुपयांची विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्याचा नियोजन केले.
अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; दोन्ही सभापतीपदांवर महाविकास आघाडीचा विजय; भाजपचीही साथ
भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या ‘होमपीच’वर अर्थात गव्हाणे वस्ती भागात उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. ठिकठिकाणी फ्लेक्स लावून त्याची जाहिरातही करण्यात आली. मात्र, या कार्यक्रमाला खासदार कोल्हे सुमारे ५ तास उशीरा आले. गव्हाणे यांच्या निमंत्रणाला मान देवून आलेल्या २५-३० नागरिकांचा अक्षरश: हिरमूस झाला. खासदारांच्या कार्यक्रमाला ५०-६० खूर्च्या अन् २५-३० माणसं… असे चित्र दिसू लागले.
पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो; नवाब मलिकांचा पटलवार
भाजपा आणि आमदार महेश लांडगे यांनी २०१७ च्या निवडणुकीनंतर भोसरी मतदार संघामध्ये चार स्थायी समिती अध्यक्ष, दोन महापौर अशी महत्त्वाची पदे दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत मतदार संघामध्ये महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दीड ते दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहे. असे असताना खासदार कोल्हे चार कोटी रुपयांच्या कामांचे ‘ब्रँडिंग’ करीत आहेत. त्याला अजित गव्हाणे खतपाणी घालत आहेत, अशी चर्चा भोसरीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, मन्नतवर दिवाळी; राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी थंडावणार?
दरम्यान, फ- प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष कुंदन गायकवाड आणि अश्विनी बोबडे या दोघांचे अर्ज आले होते. विशेष म्हणजे, बोबडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून कमल घोलप तर अनुमोदक संजय नेवाळे यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे दोघांपैकी कोण अर्ज मागे घेणार की निवडणूक होणार ? अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे अजित गव्हाणे यांनी नाराजांची मोट बांधून फ-प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला होता, अशी चर्चा आहे. पण, माजी आमदार विलास लांडे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले नाही. अजित गव्हाणे यांचा अनुभव कमी पडला. प्रभाग समितीमध्ये एकूण १६ सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे ५, मनसे १, भाजपा ८ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. तसेच, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे निधन झाले आहे. निवडणुकीत भाजपा नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी बंडखोरी केली. त्यांच्या उमेदवारीला सूचक भाजपाचे नाराज नगरसेवक संजय नेवाळे आणि अनुमोदक भाजपाच्याच नगरसेविका कमल घोलप आहेत. याचा अर्थ भाजपाचे ८ पैकी ३ नगरसेवक विरोधात होते. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या पारड्यात स्वपक्षाचे ५, मनसे-१ आणि भाजपामधील नाराज ३ असे ९ चे संख्याबळ मिळाले असते. याचा अर्थ १५ पैकी ९ मते घेवून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचा बंडखोर उमेदवार निवडून आला असता. पण, अजित गव्हाणे यांचा अनुभव कमी पडला आणि फ-प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला संधीचे सोने करता आले नाही. विशेष म्हणजे, भाजपाचे तीनही नाराज नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. तरीही गव्हाणे अपयशी का ठरले? याचे चिंतन राष्ट्रवादीला करावे लागणार आहे.
अजित गव्हाणेंची तक्रार अन् कोल्हेचा राजकीय हेतू…
खासदार अमोल कोल्हे यांनी भोसरीसाठी वेळ दिला पाहिजे, असा आग्रह वजा तक्रार अजित गव्हाणे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना कोल्हे यांनी चार-चौघांत आपला हेतू जाहीर केला. सर्वाधिक वेळा मी मोशीत आलो आहे. आतापर्यंत जे पेरलं आहे. ते निवडणुकीत उगवलं पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. उलटअर्थी, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. कार्यक्रमाचा फज्जा उडाला. ४ कोटी रुपयांच्या रस्ते दुरूस्तीकरुन मतांचा जोगवा मागणाऱ्या अमोल कोल्हे यांचा राजकीय हेतू भोसरीकरांच्या लक्षात आला. त्यामुळे कोल्हेंच्या मदतीने भाजपाची शिकार करण्याची तयारी करणारे अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाची अपरिपक्वता पुन्हा सिद्ध झाली.
Read Also :
- भाजपला मोठा धक्का: शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे 10 नगरसेवक अपात्र!
- असं का? लै मस्ती आलीये वाटतं? उदयनराजेंनी थोपटले दंड
- जिल्हा नियोजन समितीच्या निधी वर्ग करू नका, अन्यथा आत्मदहन करू; शिवसेना आमदाराचा इशारा
- तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याने कमावलेल्या उत्पन्नातून एसटी चालेल; नारायण राणेंचा अनिल परबांवर घणाघात
- छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे नाशिकमध्ये एकाच मंचावर येणार; काय आहे नेमकं कारण…वाचा…