IMPIMP

राष्ट्रवादीची सिंगम लेडी अजित पवारांच्या गटात जाता जाता कॉंग्रेसमध्ये दाखल, शरद पवार गटाला मोठा धक्का

Sonia Duhan joins Congress

नवी दिल्ली : शरद पवारांवर माझी निष्ठा कायम आहे. परंतु सुप्रिया सुळे आमच्या नेत्या कधीच होऊ शकल्या नाहीत. अशी उघडउघड भूमिका घेणाऱ्या सोनिया दुहान यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया दुहान यांनी मे महिन्यातच सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करत पक्ष सोडत असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर दुहान या अजित पवार गटात जातील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी आता कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा…शिवाजीनगरमधून शिरोळे पुन्हा आमदार होणार ? तर आघाडीत बिघाडी निश्चित ?

सोनिया दुहान यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, आज हरियाणा कॉंग्रेसमध्ये जात आहे. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला भुपेंद्रर सिंह हुड्डा, प्रदेशाध्यक्ष उदयभान, कॉंग्रेसचे प्रभारी दिपक बावरिया आदी उपस्थित राहणार आहे. दुपारी एक वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होईल असंही त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा…जानकरांना पवारांनी दिली पक्षात मोठी जबाबदारी ? विधानसभेचं तिकीट मिळणार का ?

दरम्यान, आगामी काही महिन्यात हरियाणा राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोनिया दुहान यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. सोनिया दुहान यांची राष्ट्रवादीची सिंगम लेडी म्हणून ओळख राहिलीय. यातच २०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान सोनिया दुहान चर्चेत आल्या होत्या.

READ ALSO :

हेही वाचा..कर्जबुडच्या धनाढ्यांना सुट, मात्र सर्वसामान्य जनतेची लूट, शरद पवार गटाचा मोदींवर निशाणा 

हेही वाचा..अजितदादांची धाकधुक वाढली ? विधानसभेत तब्बल १९ मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

हेही वाचा…ठाकरेंचे आता राहुल गांधी ‘ह्यदयसम्राट’ तर सोनिया गांधी ‘मॉंसाहेब’, शिंदे गटाची जळजळीत टिका 

हेही वाचा…कॉंग्रेसच्या ‘या’ पाच आमदारांचा पत्ता कट ? कॉंग्रेस हायकमांडने दिले मोठे आदेश 

हेही वाचा..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मनसे ९ उमेदवार देणार ; कुणाला मिळणार उमेदवारी ?

 

 

Total
0
Shares
Previous Article
narendra modi sad

कर्जबुडच्या धनाढ्यांना सुट, मात्र सर्वसामान्य जनतेची लूट, शरद पवार गटाचा मोदींवर निशाणा

Next Article
Hadapsar assembly Election

हडपसरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेनेत मोठी चढाओढ ; विधानसभेत कोण मारणार बाजी ?

Related Posts