मुंबई : विधानपरिषदेत शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिलेल्या उत्तरावरून विरोधी पक्ष समाधानी न झाल्याने त्यांनी विधानपरिषदेत आज चांगलाच गदारोळ केला. या वेळी सभापती निलम गोऱ्हे सर्व सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिपक केसरकर यांची पाठराखण करण्यासाठी मध्येच उभे राहिल्यामुळे त्यांना नीलम गोऱ्हे यांनी चांगलच खडसावल्याचं आज पाहायला मिळालं.
“संजय राऊतांच्या संबंधित आणखी 3 ठिकाणी इडीचा छापा”; महत्त्वाची कागदपत्रे जप्त
विधानपरिषदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांचा गदारोळ सुरू असताना मंत्री गुलाबराव पाटील अचानक उठले आणि निवेदन करू लागले. पाटील म्हणाले की, एका प्रश्नावर शिक्षण मंत्री उत्तर देत आहेत मात्र विरोधी पक्षनेते बोलत आहेत की, एक मंत्री दादागिरी करत आहे. मी त्यावेळी मंत्रिमंडळाचा सभासद होतो. अनिल परब हे मंत्री असताना त्यांनी देखील चाळीस दिवसाचा पगार दिलेला नाही. अर्थखात्याला विचारल्याशिवाय पगार देऊ शकत नाही असं बोलत होते. मात्र यावेळी गदरोळ सुरू असल्यामुळे सभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना थांबवले.
“धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
गुलाबराव आपण खाली बसा. इथे तुमचा काय संबंध आहे? तुमच्या खात्याशी संबंध नसताना, मी मंत्री होतो. तिथे काय घडलं, हे काय सांगत आहात. त्याचा इथे काय संबंध आहे का? हे तुमच्या खात्याशी संबंधीत नाही. आपल्याला परवानगी दिली आहे का? तुम्ही खाली बसा. ही पद्धत नाही. मी तुम्हाला ताकीद देते, असं सभापती निलम गोऱ्हे यांनी म्हणत गुलाबराव पाटील यांना चांगलच खडसावल्याचं पाहायला मिळालं.
“शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”
सोबतच, शिक्षण खातं दिपक केसरकर यांच्या कडे आहे. अचानक मी कॅबिनेटमध्ये काय करत होतो, याचा आत्ता विषय नाही. हात आपटुन वैगरे बोलताय, खाली बसा. संसदीय कामकाज मंत्र्याचे याकडे लक्ष वेधले जात आहे. सभागृहाचे कामकाज करण्यासाठी ही पद्धत नाही. परवानगी न घेता बोलणे योग्य नाही, असंही सभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या.
Read also
- “काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी
- “आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा
- “फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”
- 50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
- “तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले