मंदिर हा हिंदूंचा श्रद्धेचा विषय आहे त्यात राष्ट्रवादीला त्रास होण्यासारखं काय?, पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता?असा सवाल निलेश यांनी शरद पवारांना विचारत त्यांच्यावर टीका केली आहे.
अयोध्येतील राम मंदिराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. राम मंदिराबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राज्यातील 1300 डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावे. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतलं असतं तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये 1 नंबर नसता, असं निलेश राणेंनी त्यांच्या ट्विटमधून टीका केली आहे.
निलेश राणे यांनी राज्यातील डॉक्टर आंदोलन करणार असल्याच्या मुद्यावरूनही शरद पवार यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. राम मंदिराचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा राज्य सरकारवर लक्ष द्यावं, असं निलेश राणे म्हणाले आहेत.