दूध दरवाढीवरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या सरकारला जनतेशी आणि शेतकऱ्यांशी काहीही घेणेदेणे नाही. ‘एका नवरा आणि दोन बायका’ अशी या सरकारची अवस्था आहे. अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी सरकारवर केली होती.
या टीकेला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या नव-यामध्ये दोन बायका संभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे उत्तर सदाशिव लोखंडे यांनी दिले.
शिवसेना खासदारांच्या या उत्तरावर निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. “चार पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा आहे…” असे धारदार टीकास्त्र निलेश राणे यांनी शिवसेनेवर सोडले आहे.
निलेश राणे म्हणाले,” आम्हाला माहीत आहे चार पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा आहे… पुरावे द्यायची पण गरज नाही कारण जग जाहीर आहे. हा खासदार आहे, म्हणजे आपल्याला कळलं असेल हा दिल्लीला जाऊन काय करत असेल.”