शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं होतं
यावेळी उद्धव ठाकरे यांना साखरेला भाव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून संजय राऊत यांनी प्रश्न विचारला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला ठोस उत्तर न देता आदेश बांदेकर आणि होम मिनिस्टर असा संदर्भ नसलेल्या मुद्यांवर विषय फिरवल्याचे पाहायला मिळाले.
नेमका याच मुद्याचा आधार घेत भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. याबाबत ट्विट करताना माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “साखरेची MSP ठरवणाऱ्या GoM (Group of Ministers) चे प्रमुख अमित शहा आहेत हे सुद्धा ह्या दोघांना माहीत नाही. काय मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा आणि त्याच्या सोबत हा लुक्का सगळी वाट लावणार.”
साखरेची MSP ठरवणाऱ्या GoM (Group of Ministers) चे प्रमुख अमित शहा आहेत हे सुद्धा ह्या दोघांना माहीत नाही. काय मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा आणि त्याच्या सोबत हा लुक्का सगळी वाट लावणार. pic.twitter.com/2BnztfMe3i
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 26, 2020