मुंबई : शिवसेना आणि राणे कुटुंबीयाचं राजकीय वैर सगळ्यांनाच ज्ञात आहे. दोन्हीं बाजूंचे नेते एकमेकांवर चिखलफेक करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अशातच आता शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला ‘ धर्मवीर ‘ चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
धर्मवीर चित्रपट सध्या चित्रपट गृहात तुफान कमाई करीत आहे. जवळपास 10 दिवसात या चित्रपटाने 15 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे यावरून संजय राऊतांवर टिका करताना निलेश राणे म्हणाले की, 2019 मध्ये स्व. बाळासाहेबांवर संजय राऊत याने पिक्चर बनवला तो भयानक आपटला, पण दिघे साहेबांवर बनवलेला सिनेमा चांगला चालू आहे. तसेच त्यांनी खाली निष्कर्ष म्हणून संजय राऊत ठाकरेंची वाट लावायलाच आलाय, असा केला आहे.
अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
मराठी अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये यांनी साकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे.
“सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले;
दरम्यान, ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री व शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य. त्यामुळे ते देखील या चित्रपटांमुळे भारावुन गेले आहेत. तर या चित्रपटाचं झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती आणि प्रवीण तरडे यांचं लेखन-दिग्दर्शन असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालतोय.
Read also:
- धार्मिकतेवरून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर..”; गृहमंत्र्यांनी मनसेला फटकारलं
- “ओबीसी हा भाजपचा डीएनए, तर ठाकरे सरकार आरक्षणाचे हत्यारे” फडणवीसांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार
- “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान”; मनसेचा शरद पवारांवर निशाणा
- औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
- ..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी