शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून राणे पिता पुत्रांकडून शिवसेनेला वारंवार डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका करताना दिसत आहेत तर दुसरीकडे त्यांचे पुत्र निलेश राणे हे देखील वारंवार ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
नुकतेच ठाणा येथे मनसेचे अविनाश जाधव यांना अटक करून तडीपार करण्यात आले. हीच बाब लक्षात घेऊन निलेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी केलेल्या कृत्याची आठवण करून दिली आहे आणि ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला सवाल विचारला आहे.
मनसे नेता अविनाश जाधवला आंदोलन करताना अटक करण्यात आली व दोन वर्षाची तडीपारी लावली, दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार विनायक राऊत चा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो तरी त्याच्यावर साधी तक्रार नाही.असा सवाल निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. तसेच एक गोष्ट राज्य सरकारने विसरू नये… संधी सगळ्यांना मिळते अशा शब्दात सध्या सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारला त्यांनी इशारा दिला आहे.
मनसे नेता अविनाश जाधवला आंदोलन करताना अटक करण्यात आली व दोन वर्षाची तडीपारी लावली, दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार विनायक राऊत चा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो तरी त्याच्यावर साधी तक्रार नाही. एक गोष्ट राज्य सरकारने विसरू नये… संधी सगळ्यांना मिळते.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 3, 2020