निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील एका ट्विटचा फोटो शेअर केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ७ जून २०१९ला दुष्काळी दौरा केल्यानंतर राष्ट्रवादीने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं कार्टून काढण्यात आलं होतं.
याच ट्विटचा उल्लेख करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निलेश राणे राष्ट्रवादीनं केलेल्या त्या ट्विटचा फोटो शेअर करत शिवसैनिक आता राष्ट्रवादीवर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.
NCP च्या official twitter handle वर ही पोस्ट आहे. बारक्याच्या खांद्यावर कोण बसलाय बघा… सांगा त्या शेमड्या शिवसैनिकाला NCP वर केस ठोकायला… आहे हिम्मत ??? pic.twitter.com/HCNXnyqrpI
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 16, 2020
दरम्यान, नागपूरचा रहिवासी असलेल्या समीत ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी समीर ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर ट्विटरवर गुरुवारी #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टोलेबाजी होत आहे
यावरून देखील निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती “अगोदर ठाकरे कुटुंबावर कोण काय बोललं तर त्याला शोधायला शिवसैनिक जायचे आणि धरून चोपायचे पण यांचे आताचे शेंबडे शिवसैनिक तक्रार करून शांत होतात. पेंग्विन बोलला तर काय चुकलं??? पेंग्विन थंड गार हा पण थंड गार.” असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता