मुंबई : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने, लोणावळ्यात ओबीसी महासंघाने २ दिवसांची ओबीसी (चिंतन) परिषद आयोजित केली होती. या बैठकीला विजय वडे्टीवार, माणिकराव ठाकरे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, लातुर महापौर फुलबांधे, आमदार राजेश राठोड, बबनराव तायवाडे, बाळासाहेब सानप, बालाजी शिंदे, अरुण खपमाडे., भानुदास माळी, ईश्वर बाळबुधे, साधना राठोड, शरद कोळी, सोमनाथ खाशीद, बाळासाहेब शिवणकर इ. नेते उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…
यावेळी, मंचावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी, एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असे वक्तव्य केले. त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, “वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो,” असं म्हणत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला.
ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
आता यावरून राजकारण रंगले असून, यात भाजपच्या नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी, वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेऊन एक ट्विट केले आहे ज्यात, “मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कसमध्ये असतो. नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पालतू कुत्रा म्हणतात. बाकी समझदारोंको इशारा काफी है!!!” असे म्हणत शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.
मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो..
इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कस मध्ये असतो..
नाहीतर तो वाघच नसतो..
त्याला पालतू कुत्रा म्हणतात!!बाकी समझदारोंको इशारा काफी है!!!
— nitesh rane (@NiteshNRane) June 28, 2021
दरम्यान, या बैठकीत वडेट्टीवार यांनी, “मी अशा भागात राहत, जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले, तर परत जाऊ देणार नाही,” असे म्हटले. यावर मंचावर बसलेल्या बावनकुळे यांनी, “एक वाघ पटोले यांच्याकडेही पाठवा,” असे सांगितले. त्यावर वडेट्टीवार यांनी, “आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे,” असे म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला.
Read Also :
- “वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
- …तर नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर येणार राष्ट्रवादीचा महापौर? सुजय विखेंच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
- अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
- मंत्र्यांनो हा ट्रॅक योग्य नव्हे…; क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
- ‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो