राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा नेते नितेश राणे यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन डॉक्टरांचा संवाद असून राज्य सरकार स्वत:चा खिसा भरण्यासाठी कोरोनाचा धंदा करत असल्याचं डॉक्टरांचे म्हणने आहे. हा संवाद कूपर रुग्णालयातील असल्याचा दावा राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधील संवादात एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला सांगत आहेत की, “कोरोनाच्या नावाखाली धंदा सुरू केला आहे. हा खुप मोठा धंदा आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून २५-३० कोटी रूपये खर्चून महानगरपालिकेचा पैसा संपवला आहे. आम्ही, आमचे डीन आम्ही सर्व कोविड फॅसिलिटीमध्ये जातो तेव्हा पाहतो की हे काय चाललंय? हा तर धंदा सुरू आहे. त्या लोकांना कोरोना संपवायचाच नाहीये. कारण करोना संपवला तर हा धंदा बंद होईल.’असे म्हणत आहे
This discussion between 2 senior docs from Cooper hospital Mumbai..
reconfirmed what we have been saying over and over again !
Corona is big money making business for Maharashtra Gov!!! pic.twitter.com/XV2EFJlFFG— nitesh rane (@NiteshNRane) July 25, 2020