मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणपती उत्सवानिमित्ताने पुणे शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करताना 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत 144 कलम लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये देखील जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, त्यानंतर आज मुंबई पेलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुन्हा एकदा यावरून ठणकावले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुख्य मंदिरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
‘नेता-अभिनेता असला तरी घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही!’, अशा शब्दात त्यांनी लालबागमध्ये असताना, दर्शनासाठी आसुसलेल्या मुंबईकर नागरिक आणि नेते-अभिनेत्यांना ठणकावलं आहे. आज त्यांनी ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाशी चर्चा केली. गणेशोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी आधी या परिसरातील दुकानं बंद केली होती. त्याला स्थानिकांनी विरोध केल्यांनतर पोलिसांनी स्थानिकांशी चर्चा करुन, मध्यस्थीचा मार्ग काढला आणि दुकानं सुरु करण्यात आली.
गणराया, पहिल्यांदा कोरोना दूर कर, काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर – छगन भुजबळ
पोलिसांनी लालबागच्या राजाची स्थापना करणारे, स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना, दुकानं बंद करण्याची नोटीस पाठवली होती. त्यामुळे लालबाग मार्केट परिसरातील स्थानिकांत प्रचंड नाराजीं होती. तसेच, लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे कुणी भाविक इथे येणार नसतील, तर स्थानिकांची दुकानं का बंद करण्यात आलीत? असा प्रश्न रहिवासी विचारत होते. या पार्श्वभूमीवर आज पाटील यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवला.
उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी आजच्या काँग्रेसची अवस्था – शरद पवार
“इथे गर्दी होऊन संसर्गाला चालना मिळेल, त्यामुळे दुकानं बंद ठेवायला सांगितलं होतं. पण आता मालक आणि एक कामगार अशांनाच परवानगी दिली आहे. इथे गर्दी होणार नाही याची काळजी कार्यकर्ते आणि प्रशासन काळजी घेईल. १० लोकांना आरतीसाठी परवानगी असेल, यात कोणीही का असेना त्याच्याशी पोलिसांचं देणं घेणं नाही,’ असं ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष दर्शन, मुखदर्शन यांवर निर्बंध घातले आहेत.
Read Also :
- मोठी बातमी : भाजपच्या माजी मंत्र्याची गळा दाबून हत्या; राहत्या घरातच सापडला मृतदेह
- शिवसेनेला अजून एक धक्का : माजी खासदार आनंदराव अडसूळ, मुलगा, जावयाकडे ईडीच्या धाडी
- लूकआऊट सर्क्युलरनंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, दिला ठाकरे सरकारला इशारा
- गिरीश महाजन म्हणाले, ‘ती माझी चूक झाली, मी मान्य करतो’
- ब्रेकिंग! नितेश राणे आणि नीलम राणेंविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी