पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात थैमान घाटले आहे. दिवासला हजारोच्या संख्यंने लोक मरत आहेत, अशा संकटळाच्या परिस्थीत राज्यात जनेतेच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी उत्तमरित्या पारपाडले आहे. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतके कोणताच नेता फिरला नसेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, लसीकरणाचे ग्लोबल टेंडर, मराठा आरक्षण आणि राज्यातील कोरोना परिस्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्याप परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार म्हणतात. पण मग मुळात लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द उच्चारलाच कसा?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे सचिन सावंत यांनी नागपूरातील मराठा याचिकाकर्त्यांना भाजप रसद पुरवत असल्याचे आरोप केले आहेत, त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे. तसेच यावेळी आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी भाजप काही लोकांना फूस देत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.