मुंबई : मुंबईत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार घणाघात चढवला. सगळं सहन करून मी हिमंतीने उभा राहिलोय. त्यामुळे राजकारणात एकतर ते राहतील किंवा मी राहिन. असं म्हणत ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर पलटवार करत खोचक टिप्पणी केलीय.
हेही वाचा..विधानसभा निवडणुका ठाकरे गट ‘या’ चिन्हावर लढणार ? निवडणूक आयोगाला धाडलं पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंद म्हणाले की, राजकारणात कुणी कुणाला कायमची संपवण्याची भाषा करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी बरंच काम केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. आज उद्धव ठाकरे आव्हानाची भाषा करत आहेत. मात्र, त्यापूर्वी आपण कुठं आहोत, याचा विचार त्यांनी करायला हवा. खरं तर आव्हानाची भाषणं करण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो. फुकटच्या गोष्टी करून कुणी कुणाला संपवू शकत नाही. असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलंय.
दरम्यान, मुंबईत येथे उद्धव ठाकरे बोलतांना म्हणाले होते की, मला आणि आदित्यला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते, हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे. त्यामुळे आता राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिन. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही, पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी त्यांना आव्हान देत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…३० वर्षांचा माढ्याचा किल्ला यावेळी ढासळणार ? शरद पवारांची ‘तुतारी’ माढ्यात वाजणार ?
हेही वाचा..राहुल गांधींची सभागृहात जात विचारली, कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात राज्यात निदर्शने
हेही वाचा..“देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व गुण, ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत तर आनंदच..”
हेही वाचा..महायुतीत बिनसलं..! नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध
हेही वाचा..विकासाची गॅंरंटी..! जनतेचे १२०० कोटी पाण्यात, नव्या संसदेला लागली गळती..!