मुंबई : पुणे, मुंबईतील बलात्काराच्या अमानुष घटनांनी समाजमन सुन्न झाले असतानाच डोंबिवलीतील १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिन्याच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, भाजप नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, दोन दिवस अधिवेशन बोलवून चिंतन करावे, असे म्हटले आहे.
किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘मास्टरप्लॅन’; भाजपच्या मुसक्या आवळणार?
पीडित मुलगी डोंबिवली ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला. त्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ त्याने काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकर व त्याच्या मित्रांनी २९ जानेवारी ते २२ सप्टेंबर या काळात पीडितेवर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे सामूहिक बलात्कार केला. काही आरोपी राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे.
२०२२ च्या महापालिका निवडणुकासाठी 3 सदस्यांचा प्रभाग होणार; राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
या प्रकरणावर सरकारने दोन दिवस अधिवशेन बोलावून चिंतन करावे. साकीनाकानंतर आता डोंबवली प्रकरण राज्यातील अत्याच्याराच्या घटना आता सांगायला सुरुवात केली तर २४ तास कमी पडतील. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे. तुम्ही हजार वर्ष सत्तेत राहा, तुमची सत्ता सुरक्षित ठेवा. पण राज्यातील महिलांवर बलात्कार होत आहेत आणि राज्यात आपण या गंभीर विषयावर चर्चा करणार नाही. इतर राज्यातील घटनांचे उदाहरण देऊन आपण राज्यातील घटनांकडे दुर्लक्ष करता, हे बरोबर नाही, या शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करा: काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
दरम्यान, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा घटनेवर भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त असून, राज्यात भयाचे वातावरण तयार झाले आहे. डोंबिवली भाग जो एक शांत भाग समजला जातो तेथे ही घटना झाली आहे. राज्य सरकारने विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Read Also :
- सत्तांतर होणार? पुणेकरांचा कौल कोणाला? महाविकास आघाडीमुळे एकहाती सत्तेसाठी रस्सीखेच
- राज्यसभेसाठी भाजपच्या निलंबित १२ आमदारांची काँग्रेससोबत सेटलमेंट? फडणवीसांच रोखठोक उत्तर
- ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
- भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात बलात्काराचा प्रयत्न; ताईगिरी करणाऱ्या चित्रा वाघ आता कुठे आहेत?
- लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंचा संताप