मुंबई : लोकसभेत महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच हताश झाले आहेत. यातच काल मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजय संकल्प पार पडला. यावेळी फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आवाहन केले. तर आता विजयानंतरच गळ्यात हार घालणार असा निश्चय देखील फडणवीस यांनी यावेळी केला.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईकरांनी २६ लाख मत दिली तर महाविकास आघाडीला २४ लाख मिळालीत. मराठी माणसाने महाविकास आघाडीने मतदान केलेलं नाही. महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह तयार केला. त्याला आपण उत्तर देऊ शकलो नाही. किंवा मग आपल्याला समजलं नाही की हे इतकं इफेटिव्ह होऊ शकतं. पण फेक नरेटिव्ह एकदा चालतो, सारखा सारखा चालत नाही. तो बाऊन्स बॅक होतो. व्ही आर डाऊन बट व्ही आर नॉट आऊस असं म्हणत फडणवीसांनी कार्यकर्त्यांच्या अंगात बळ भरलं.
हेही वाचा…अजित पवारांना सोबत घेऊन भाजपचे नुकसान झालं का ? बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आम्ही सध्या डाऊन झालो आहोत. परंतु आम्ही अजूनही आऊट झालो नाही. आता इतिहासात रमून चालणार नाही. फेक नरेटिव्हचे बारा वाजवायचे असतील तर सेल्फ स्टार्ट द्यायला हवा. त्यासाठई फेक नरेटिव्हचा पराभव करायचा असेल तर ही निवडणूक जिंकायची आहे. क्या हार मे, क्या जित मैं. हे आता आपण स्विकारायला हवं. देशात जितक्या जागा संपुर्ण इंडिया आघाडीला मिळाल्या नाहीत. त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपला मिळाल्या असल्याचंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..“अपमान झाल्यानं नाशिक लोकसभेच्या निवडणूकीतून माघार घेतली”, भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा..“RSSअन् भाजपकडून एवढे हाडतुड केले तरी मित्र मंडळ तिथचं”, शरद पवार गटाने डिवचलं
हेही वाचा…“मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात ‘जयंत पाटील’ सक्षम नेतृत्व”, रोहित पवारांचा मोठं विधान
हेही वाचा…नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार
हेही वाचा..नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार