मुंबई : यंदाचे हिवाळी अधिवेशन हे कमालीचे वादग्रस्त ठरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारपणाने त्रस्त असल्या कारणाने त्यांनी हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती दर्शविली नव्हती. त्याच्या ऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी पार पाडली होती.
नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनात तर गैरहजर राहिलेच मात्र ते मंत्रालयातीही जास्त फिरकत नाही अशी तक्रार विरोधी पक्षातील नेते करत असतात. मुख्यमंत्र्यांच्या या सवईवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.
चंद्रकांत पाटलांचे ‘युती’चे संकेत अन् महेश लांडगेंची शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी!
महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं आहे की तुमच्यकडून जनतेला आता अपेक्षा राहिलेल्या नाहीत. समाजातील कोणत्याही स्तरावर जर अडचण असतील तर लोक त्या अडचणी घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे येत असतात. आता सगळ्याचं अडचणीचं निराकरण हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे करत असल्याने उद्धव ठाकरे हे फक्त नामधारी आहे आणि कामधारी राज साहेब ठाकरे आहेत. त्यामुळे मंत्रालयाचा नवीन पत्ता शिवतीर्थ आहे असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी मारला आहे.
म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे pic.twitter.com/2RhEQFJRei
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 6, 2022
संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत मंत्रालयातचा फोटो शेअर केला आहे. या टि्वटमध्ये त्यांनी तीन वर्षांचा कालावधीत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय कसे बंद आहे. हे चित्राच्या माध्यमातून रेखाटलं आहे. आपल्या टि्वटमध्ये देशपांडे म्हणतात, ”म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे,” टि्वटमध्ये त्यांनी तीन वर्षांचा कालावधी दाखवला असून कार्यालय बंद असल्यामुळे धूळ बसलेली दाखवले आहे.
Read also:
- परदेशातून आलेल्या नागरिकांची पुणे विमानतळावर होणार आरटीपीसीआर चाचणी.!*
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
- बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं
- आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी
- नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा; आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी