ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीत ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी समीर ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर ट्विटरवर गुरुवारी #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता.
दरम्यान, यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. या विषयाला अनुसरून ट्विट करताना निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “अगोदर ठाकरे कुटुंबावर कोण काय बोललं तर त्याला शोधायला शिवसैनिक जायचे आणि धरून चोपायचे पण यांचे आताचे शेंबडे शिवसैनिक तक्रार करून शांत होतात. पेंग्विन बोलला तर काय चुकलं??? पेंग्विन थंड गार हा पण थंड गार.”
अगोदर ठाकरे कुटुंबावर कोण काय बोललं तर त्याला शोधायला शिवसैनिक जायचे आणि धरून चोपायचे पण यांचे आताचे शेंबडे शिवसैनिक तक्रार करून शांत होतात. पेंग्विन बोलला तर काय चुकलं??? पेंग्विन थंड गार हा पण थंड गार. pic.twitter.com/xoLv1PvFvd
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 16, 2020