मुंबई : क्रुज ड्रग्स प्रकरणात एनसीबी आणि समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा कार्यक्रम नवाब मलिक आणि संबंधितांनी बनवला आहे. त्या अनुषंगाने रोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप करत असताना आता केंद्र सरकारवर किंवा तपास यंत्रणाना दोषी ठरवण्यासाठी खोटे, चुकीचे ठरविता येईल यासाठी असा ओढूनताणून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातूनच आता ही व्हिडीओ क्लिप आली असावी, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
शाहरुख खाननं भाजपात प्रवेश केला तर कोकेन नव्हे, पीठ सापडलं म्हणून सांगतील – छगन भुजबळ
एनसीबीच्या समीर वानखेडेंच्या विरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओ क्लिपसंदर्भात विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे दिली. एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर ट्वीट करुन त्या आधारे अनुमान लावणे, हे एका जबाबदार खासदाराने वागणे चुकीचे वाटते. व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून जर ते खरे असेल तर, त्यावर भाष्य करणे योग्य होईल. कोणी तरी व्हिडिओ क्लिपमध्ये बोलतोय‘सत्यमेव जयते’ बोलत असेल व त्या आधारे अनुमान लावणे हे चुकीचे आहे. आपण बोलतोय ते खरे आहे, हे दाखवण्यासाठी त्या गोष्टी क्रिएट केल्या जात नाहीत ना? अशा प्रकारचा दाट संशय येतो, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
माझ्या मागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे – संजयकाका पाटील
त्या कंपनीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावीआरोग्य विभागाच्या परीक्षेच्या झालेल्या गोंधळाबाबत दरेकर म्हणाले, या आधीही आरोग्य विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेत गोंधळ झाला. त्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्या. त्यातून सरकारने शहाणपण शिकायला पाहिजे होते. मात्र, तरीही त्याच काळ्या यादीतील (ब्लॅक लिस्टेड) कंपनीला पुन्हा परीक्षांचे काम दिले गेले. ज्या चुका मागील वेळेस झाल्या होत्या त्या दुरुस्त केल्या नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार, मंत्री बच्चू कडू या सर्वांनीच एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी केली. मात्र, त्याला केराची टोपली दाखवली गेली. परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपनीचे आणि अन्य कोणाचे काही साटेलोटे आहे का, यामध्ये काही व्यवहार झाले आहे का, याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
Witnes in #AryanKhan case made to sign on blank paper by NCB is shocking. Also thr r reports that thr ws demnd of huge money .CM UddhavThackeray said tht ths cases r made 2 defame Mah'shtra.Ths seems 2b comng tru @Dwalsepatil
Police shd tk suo moto cognizance@CMOMaharashtra pic.twitter.com/zipBcZiRSm— Sanjay Raut (@rautsanjay61) October 24, 2021
आज सकाळी दहा वाजताचा पेपर बारा वाजता सुरु झाला. नाशिकला परीक्षेची वेळ झाली तरी, पेपर आला नव्हता. अक्षय कॅम्पसला आज वेळेवर पेपर पोहोचले नव्हते. तीन-चार हजार रुपये खर्च करुन सिंधुदुर्गमधून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते, मात्र, त्यांनाही या गोंधळाचा फटका बसला. नाशिकमध्येही परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. काही ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची प्रवेश पत्र आले नव्हते. अशा प्रकारे विद्यार्थी आणि त्यांच्या भविष्यावर सरकारने पाणी फिरवण्याचे काम केले आहे. म्हणून या सर्व प्रकरणाची एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणीही प्रविण दरेकर यांनी केली.
Read Also :
- महाविकास आघाडी सरकार नसते तर छगन भुजबळ मंत्री म्हणून दिसलेच नसते – संजय राऊत
- भाजप खासदाराला साधा निवडणुकीचा अर्ज भरता येत नाही, याला काय म्हणायचं – गुलाबराव पाटलांचा टोला
- पिंपरी चिंचवडनंतर आता शरद पवारांची पुणे महापालिकेकडे कूच; दिवाळीनंतर सत्तांतराची रणनिती आखणार!
- आरोग्य विभागाच्या परिक्षेतील सावळा गोंधळ संपेना; एकाच वेळी चार परिक्षांचे वेगवेगळे केंद्र, विद्यार्थी संतापले
- औरंगाबादच नाव बदलण्याची आमच्यात हिंमत आहे, तुम्ही मैदानात या, दाखवतो – चंद्रकांत खैरे