मुंबई : येत्या 5 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहेत. दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यावरूनच भाजपचे नेते राम कदम यांनी शिवसेनेला डिचवण्याचा प्रयत्न केला आहे.
बिगबॉसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल; गुलाबराव पाटील
भाजप नेते राम कदम यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेना राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडे मदत मागणार आहे. आता काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी पार्कचे मैदान भरणार काय सत्य आहे. हे पेंग्विन सेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्राला सांगावे अशी टिका राम कदम यांनी केली आहे. राम कदम यांच्या टिकेला शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार. पेंग्विन सेनेची तुम्ही काळजी करू नका, मुंबईत ती उत्तम काम करतेय.. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लोक धन्यवाद देतात कारण परदेशात जाऊन जे सुख पाहायला मिळतं. ते मुंबईत पेंग्विनमुळे मिळतं असं म्हणत त्यांनी राम कदमांना सुनावलं आहे.
“मिंधे गटाची पहिली विकेट गेली, अशा 40 पैकी 39 विकेट जाणार”; रूपाली पाटील
दरम्यान, एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे.
“ED पासून सुटका व्हावी म्हणून BJP मध्ये गेले, पण शेवटी भाजपने इडी भीती घातलीच”
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या देखील दसरा मेळाव्याचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची ताकद दिसणार ऐतिहासिक दसरा मेळावा असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी वाजत गाजत , गुलाल उधळत या.. पण शिस्तीत या असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान…. शिवसेनेच्या पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा. असं देखील त्यात म्हटलं आहे. शिवसेनेचा हा दसरा मेळावा 5 आक्टोंबर रोजी सायंकाळी 06:30 वाजता होणार आहे.
Read also
- “सरकार पडल्यानंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याची टिका
- “नागपुरची चड्डी ज्याने घातली, तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो”; नाना पटोलेंचं वक्तव्य
- पोहरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून सेनेत प्रवेश..! बंजारा समाजाचे महंतांचा सेनेला पाठिंबा
- इकडे आड तिकडे विहिर..! प्रताप सरनाईकांसाठी भाजपचा नवा डाव, शिंदेंनी हात झटकले
- वडेट्टीवारांनी कोवीड काळात मृतदेहांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं..! भाजपचा वेढा आता काॅंग्रेसच्या नेत्यावर