मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनाप्रमुख तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा सूडाचं राजकारण करत असून नारायण राणेंच्या अटकेमुळे शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप सध्या होत आहे. याच प्रकरणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मोठी बातमी : शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर EDची धाड
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांवर काही दिवसांपासून कारवाया सुरूच आहेत. आम्हाला ईडीची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचं हास्य ढळणार नाही. शिवसेना हे ईडीचं लक्ष्य आहे. पण त्याचा तसूभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, त्यांचं मनोधैर्य खचणार नाही. उलट वाढेलच. अनिल परब कायदा क्षेत्रातले जाणकार अल्याने काय करायचं हे त्यांना माहित आहे.
शिवसेना खासदार भावना गवळींना मोठा धक्का; ५ संस्थांवर ED ची छापेमारी
सूडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण यातून हे सगळं सुरू आहे. सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील, असा सूचक इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला आहे. तसंच कर नाही त्याला डर कशाला? आम्ही काहीही असेल तरी चौकशीला सामोरे जाऊ, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ईडी आणि भाजपाची हातमिळवणी आहे. त्यामुळे त्याची आधी चौकशी व्हायला हवी.
परब यांचा करण्यात आला ‘करेक्ट कार्यक्रम’? फडणवीसांकडून आली प्रतिक्रिया
काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, “ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. अनिल परबांना भाजपा नेत्यांनी टारगेट केलंय. मात्र, परब नोटिसला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करतील,” असेही राऊत म्हणाले. तसेच “एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत आहे,” असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.
Read Also :
- ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग, अनिल परब संजय राऊतांच्या भेटीला
- दहीहंडी साजरी करणार! मनसे-पोलीस आमने-सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
- “महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो”, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- “राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, हि विकृती कधीही आहे, जाणार नाही”
- पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था – नाना पटोले