नाशिक : मुख्यमंत्री पद येतं जातं, पण आपल्या कुटुंबातील माणुस म्हणून तुम्हा मला जे प्रेम देत आहात मला नाही वाटत हे गद्दारांच्या नशिबात असेल. असं म्हणत काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला. तसेच त्यांनी नाशिकचे शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांना देखील खोचक टोला लगावला. त्यावर सुहास कांदे यांनी देखील त्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी 2024 मध्ये एनडीएमध्ये यावं, ” केंद्रीय मंत्र्यांची शरद पवारांना खुली ऑफर
कालच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा ५० खोक्याला विकला गेला. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर लगावला. त्यावरून माझी नार्को टेस्ट करा. असं आवाहनच सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना बोलण्यापुर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात, त्या जनाबांना आधी सांभाळा”
सुहास कांदे म्हणाले की, खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. मी ज्या कॉंट्रॅंक्टरांची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा. उद्धव ठाकरे यांनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. पाटणकरांची चौकशी करण्याची मागणी करा. किती लोकांना फोन केले. किती लोकांना मध्यस्थी केली, राजीनामा देण्यापुर्वी याचा मी स्वत: साक्षीदार आहे. या कान्टॅ्क्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा. असंही सुहास कांदे यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…“काल सधू अन् मधू भेटले, विराट सभा पाहून त्यांनी एकमेकांचे अश्रू पुसले”, राऊतांचा खोचक टोला
- हेही वाचा…“राहुल गांधींना जाहीरपणे सांगतोय की.. ” उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही दिला इशारा
- हेही वाचा…“भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष, काही चांंगली माणसं कशी सहन करतात “, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
- हेही वाचा…“राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मुर्खता”, बच्चू कडूंची जहरी टिका
- हेही वाचा…“तर अजित पवार यांनी माझ्या कामठी मतदारसंघात निवडणुक लढायला यावं”, बावनकुळेंचं आवाहन