पिंपरी चिंचवड : आज सकाळी पुण्यात, म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या इमारतीचं उद्घाटन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी, “पुणे महापालिकेतही महाविकास आघाडीचाच झेंडा फडकवायला हवा”, अशी शिवगर्जना केली आहे. “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, मग महापालिकेतही तेच हवं”, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडे यांनीच घडवलं, आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते”- फडणवीस
दरम्यान, यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. यावेळी, “पिंपरी-चिंचवड मध्ये शिवसेनेचा महापौर बनवणे, हे आपले ध्येय आहे. शहरात कमीत कमी ५० नगरसेवक तरी निवडून आणण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे,” ” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. यावर पत्रकारांनी, “५० मध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर होत नाही”, असं म्हटलं. त्यावर, “५५ आमदारांत मुख्यमंत्री झाला, पिंपरी-चिंचवडचा महापौर ५० नगरसेवकांत का होणार नाही?,” अशी शाब्दिक फटकेबाजी केली.
“मुंडे साहेबांना तर शपथही…” आणि गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने, पंकजा मुंडे झाल्या भावुक
यावेळी त्यांनी, सीबीआय, ईडी, केंद्राने तयार केलेलं नवीन सहकार खाते, पंकजा मुंडे आणि नारायण राणे यांच्यावरही भाष्य केलं. केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा, केंद्र सरकारने धुळीस मिळवली आहे. त्यांचा उपयोग फक्त दहशत निर्माण करण्यासाठी केला जात आहे. केंद्राचं नवं सहकार खातं, केवळ राज्याला त्रास देण्यासाठी तयार केले असेल, तर हा देखील एकप्रकारे सत्तेचा गैरवापर आहे. राज्यातील सहकार चळवळ संपवण्यासाठी हे पाऊल असेल, तर ते लोकशाहीला फार मोठा धोका आहे,” असं देखील त्यांनी नमूद केलं.
लातूरमध्ये राष्ट्रवादीने, भाजप-काँग्रेसला दाखवली वेळ; लावले अनेक पदाधिरकारी गळाला
“पंकजा मुंडेंना राजकारणातून संपवण्याचे काम सुरु आहे. नारायण राणेंची दैदिप्यमान कारकीर्द पाहता, त्यांना मोठे पद मिळायला हवे होते, असं म्हणत त्यांनी दोन्ही नेत्यांना भाजपने अजूनही कमी लेखले असल्याचाच अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
Read Also :
- पक्षात मी-मी चालत नाही, आधी राष्ट्र, पक्ष आणि शेवटी मी; ही भाजपची संस्कृती, पंकजाताईंचा रोख कुणाकडे?
- पुण्यात एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार – देवेंद्र फडणवीस
- प्रकाश आंबेडकर ICU मध्ये, मात्र बायपास सर्जरी यशस्वी, रेखा ठाकूर यांची माहिती
- “मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची टीका
- अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरण : घडामोडींना वेग, तळोजा जेलमध्ये होणार वाझेची चौकशी