मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंतरही संप सुरू राहणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. सरकार चार पावले पुढे आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर यावे, असे आवाहन करतानाच संप मागे न घेतल्यास पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दिला.
मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार आहे; नारायण राणेंच्या दाव्याने उडाली खळबळ
परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत चर्चा केली. या बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर ते म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण केल्याने आता संप मागे घ्यावा. एसटी सेवा बंद राहणे राज्याच्या हिताचे नाही. प्रवाशांची गैरसोय होते तसेच ते कर्मचाऱ्यांच्याही हिताचे नाही. विलीनीकरणाचा मुद्दा हा न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. समिती जो अहवाल देईल तो सरकारला मान्य असेल.
कोल्हापूरात काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध; भाजपच्या अमल महाडिकांची निवडणूकीतून माघार
आतापर्यंत ११ हजार ५४९ कर्मचारी सेवेत परतले आहेत. त्यामध्ये प्रशासकीय विभागातील ६ हजार ९७३, कार्यशाळा ३ हजार ५४९, चालक ५९४ आणि वाहक श्रेणीतील ४३३ कर्मचारी कामगारांचा समावेश आहे. तर ३७ आगारांतून वाहतूक सुरू झाली आहे. सांगलीतील सर्वाधिक १० आगार सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध मार्गांवर ३१५ एसटी धावल्या. त्या माध्यमातून ९ हजार ५५१ प्रवाशांना सेवा देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.
पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार- नाना पटोले
आर्थिक भार स्वीकारत राहायचे आणि त्याबदल्यात एसटी बंद ठेवायची, असे चालणार नाही. पगारवाढ देताना सरकारने वेतनाची हमी घेतली आहे. बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत. सातवा वेतन आयोग लागू करा आणि चार वर्षांचा करार दहा वर्षांचा करा, अशा काही मागण्या चर्चेतून समोर आल्या आहेत. त्यावरही विचार करू शकतो, असे अनिल परब यांनी सांगितले.
Read Also :
- संपाचा हट्ट जर कायम असेल तर नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी – संजय राऊत
- एसटी संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी; जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट
- महेश लांडगे ‘ऑन प्रॅक्टिकल मोड’ : अधिकारी पिंपरी- चिंचवडकर आहेत; आयुक्तांचे ऐका अन् माझे फ्लेक्स काढून टाका!
- महापालिका आयुक्तांचे आदेश : आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाका!
- शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावर छापा; किरीट सोमय्यांच्या आरोपावर ED ‘अॅक्शन मोड’मध्ये