कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्यासाठी बोरगावमध्ये होणार संस्थापक पॅनल आणि सहकार पॅनल मध्ये काटे की टक्कर
हे पण वाचा, डॉ. सुरेश भोसले आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात कृष्णा साठी ‘खलबतं’; निवडणुकीचा सस्पेन्स वाढला
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्याच्या दिशेने चालला आहे आणि अंतिम टप्प्यात तिन्ही पॅनलकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विद्यमान संचालक आणि डॉ. सुरेश यांच्या तर्फे अतुल भोसले प्रचाराची जोरदार धुरा सांभाळत आहेत. वाळवे येथे झालेल्या सभासदांच्या प्रचार बैठकीत अतुल भोसले यांनी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही जसे आमच्या प्रचारात गेल्या ६ वर्षांपासून केलेल्या कारखान्याच्या प्रगतीबद्दल सांगत आहोत तसे विरोधक त्यांच्या काळातील कारभाराबद्दल बोलायलाच तयार नाहीयेत. विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडे बोलायलाच नाही अशी टीका अतुल भोसले यांनी केली आहे.
हे पण वाचा, कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी भोसले विरुद्ध मोहिते गटात रंगणार कलगीतुरा
डॉ. अतुल भोसले म्हणाले की, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा साखरकारखान्यात अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे कारभार सुरु आहे. विद्यमान संचालक मंडळाने गेल्या सहा वर्षात साखर, पारदर्शक तोडणी, उच्चांकी ऊसदर, सर्वाधिक साखर उतारा, मोबाईलवरून शेतकऱ्याच्या उसाची नोंद करणे यांसारखे सभासद हिताचे निर्णय घेतले गेलेले आहेत. विरोधकांनी त्यांच्या हातात सत्ता असताना एफआरपी पूर्ण करण्यासाठी कर्ज उचलले होते त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलण्याचा हक्क पहिलेच गमावलेला आहे असे म्हणत विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
हे पण वाचा,
कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?