मुंबई : जवळपास 9 दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी अशी अचानक खेळी केल्यानंतर मंत्रिमंडळात राहणार नसल्याचंही सांगून टाकलं. मात्र त्यानंतर लगेच भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी उपमख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी सर्वांची इच्छा होती मात्र ते झालं नाही. त्यामुळेच आम्ही त्याचा राग अमित शहां यांच्यावर काढला. असं नागपुरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.
“हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदासाठी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. अशीच नाराजी काहीशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शहांवर काढली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन करणारा पोस्टर झळकला. या बॅनरमध्ये देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चंद्रकांत यांचे फोटो होतो. मात्र अमित शहा यांचा फोटो कुठेही नव्हता.
“ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या आदेशानंतर लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळीच भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे का? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवरून अमित शहा यांचा फोटो हटवल्यानंतर अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी केलेलं शिवसेनेतील बंड हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं बंड होतं. त्यानंतर जवळपास 9 दिवस राज्यात मोठ्या राजकीय वादळी घटना घडल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेंना फटकारत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करून सगळ्यानांच धक्कातंत्र दिलं. त्याचबरोबर मंत्रिमंडळात आपण राहणार नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात एक नवी राजकीय खेळी खेळल्याचं बोलण्यात येत आहे.
Read also
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
- “राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री द्या”, बच्चू कडूंची मागणी; तर मंत्रिपदावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी
- “लक्षात ठेवा.. यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
- मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब
- शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेस; अब्दुल सत्तार, भुमरें अन् संजय शिरसाठ यांच्यात वाद