मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. राज्यापालांनी ३ ते ४ जुलै रोजी अधिवेशन घेण्याचं सांगितलं असून त्यात शिंदे सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्षांसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामार्तोब करण्यात आला आहे. त्यांनी आज त्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
“ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव तर शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आज भाजपने राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करत त्यांनी आज त्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ३ ते ४ म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी अधिवेशन होणार असून शिंदे सरकारला या अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्यास राज्यापालांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
गेल्या एक ते दोन वर्षापासून विधान सभा अध्यक्षांची निवड रखडलेली होती. याकाळात विधानसभा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी कारभार सांभाळला होता. अशातच आता शिंदे सरकार अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे. यासंदर्भात तात्काळ सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने सर्वाेच्च न्यायलायत केली होती. मात्र ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी 11 जुलै रोजीच होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
शिंदे गटातील दिपक केसरकर विधान सभा अध्यक्ष झालेत तर बंडखोर 16 आमदारांवरील निलंबणाची कारवाई टळू शकते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांसाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार असून शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांच्या नावाची शिफारस करण्याची शक्यता आहे. तसेच विधिमंडळातील दिर्घ अनुभव असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील सरकारच्या काळात जवळपास 5 वर्ष विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी संभाळली होती.
Read also
- “राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री द्या”, बच्चू कडूंची मागणी; तर मंत्रिपदावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी
- “लक्षात ठेवा.. यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
- मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब
- शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेस; अब्दुल सत्तार, भुमरें अन् संजय शिरसाठ यांच्यात वाद
- “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं