भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत असे विधान केले होते आता यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडून आम्हाला कोणात प्रस्ताव नाही. यामुळे हा विषय आता आमच्यासमोर नाही. असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
फडणवीस म्हणाले की, चंद्रकांत दादा जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात बोलले आहेत. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की, आमचे आता ठरले की, आता आम्ही भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे. तसंच आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडून आम्हाला कोणात प्रस्ताव नाही. यामुळे हा विषय आता आमच्यासमोर नाही असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करत या विषयावर पडदा टाकला आहे.