मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. मुंबै बँकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सहकार पॅनलने २१च्या २१ जागा जिंकत विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला.
राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका ओबीसींविना घेऊ नये, बावनकुळेंची सुप्रीम कोर्टात धाव
यामध्ये पहिल्या काही दिवसांमध्ये १७ उमेदवारांचे निकाल लागले होते. त्यानंतर ४ जागांसाठी देखील बिनविरोधाचा प्रस्ताव टाकण्यात आला होता. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचाही समावेश करण्यात आला होता. सर्वचच्या सर्व जागा जिंकत दरेकरांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले होते. मात्र आता प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसला आहे. प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचे सांगत सहकार विभागाने त्यांना अपात्र ठरवले आहे. मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यांनी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून फॉर्म भरला होता. मात्र यंदा त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती. ‘या नोटिशमध्ये ‘आपण मजूर आहात की नाही,’ अशी विचारणा करण्यात आली होती.
एनसीबीमधून समीर वानखेडेंची अखेर बदली, ‘या’ खात्यात केली नियुक्ती
सहकार विभागाने केलेल्या चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. मजुरीचे काम न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे,” असे आदेश उच्च न्यायालयाकडूनही देण्यात आले होते. दरेकर हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपला स्वतंत्र व्यवसाय आहे असं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे ते कोणत्याही बाजूने मजूर नाहीत. सहकार विभागाने दरेकर यांना अपात्र ठरवताना याच बाबींकडे लक्ष वेधत तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असे आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
Read also:
- सांगलीत बैलगाडा शर्यत होते मग लांडेवाडीत का नाही? नक्की पाणी मुरतय कुठं? आढळरावांची पोस्ट व्हायरल
- राणे, भाजपकडून पैसा मिळाल्यानेच मी फिरायला गेलो होतो, असं वाईगंणकर म्हणत आहेत – सतीश सावंत
- दानवेसाहेब तुम्ही देशाचे रेल्वे मंत्री आहेत की फक्त जालन्याचे, हे कळतंच नाही; इम्तियाज जलीलांचा टोला
- “चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही”, भुजबळांचा पलटवार
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंनी कशी जिंकली?, दीपक केसरकरांनी सांगितलं गुपित!