राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Senior Congress leader and former Maharashtra CM Shivajirao Patil Nilangekar passes away in Pune.
(file pic) pic.twitter.com/CrSiIWiDJI— ANI (@ANI) August 5, 2020
91 वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे होती. त्यांना मधुमेह, रक्तदाब, किडणीचा त्रास त्यातच कोरोनाची लागण झाली होती, मात्र त्यावर मात करण्यास त्यांना यश आले होते.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म ०9 फेब्रुवारी 1931 रोजी निलंगा येथे झाला होता. ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही होते. एम.ए., एल.एल.बी. पर्यंत त्याचे शिक्षण झाले होते. ते महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. 1985-86 मध्ये त्यांनी 9 महिन्यांसाठी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. तर 1990-91 या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते.