IMPIMP
Otherwise, the candidate will drop his name in the assembly elections, the hunger strike is suspended but Otherwise, the candidate will drop his name in the assembly elections, the hunger strike is suspended but

“अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार”, उपोषण स्थगित पण…

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानंतर जरांगे पाटलांना सरकारला एक महिन्यांचा काळ वाढवून दिलाय. त्यानंतर सुरू असलेलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला आहे.

हेही वाचा…“प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही,” राज्यसभेच्या उमेदवारीवरून डावलल्यानंतर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया

गेले काही दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी आज शंभुराजे देसाई यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संदीपान भुमरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील सोबत होते. यावेळी शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनंतर आपल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी एक महिन्याची मुदत दिलीय. त्यामुळे सहाव्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे.

हेही वाचा…“लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, अजित पवार गटाचा आरएसएसवर पलटवार 

मनोज जरांगे पाटलांनी सरकारपुढे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. मराठा- कुणबी एकच आहेत, याबाबत कायदा करावा. राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबादल गॅझेटचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा. शिंदे समितीला एक वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी. अशा मागण्या ठेवल्या आहेत.

दरम्यान, येत्या काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्याची तयारी आता सुरू करण्यात आली आहे.  यातच १३ जूलैपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्यांबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार असा इशाराही त्यांनी दिला.

READ ALSO :

हेही वाचा..अजितदादाला घेतल्याने संघ बाटला असे RSS वाटतं, परंतु ते ऐकून दादांना काय वाटतं ? ते ऐकायचं आहे 

हेही वाचा…“भाजपचा सुपडा साफ केला नाही तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही”, कॉंग्रेसच्या खासदारानी दिली डरकाळी 

हेही वाचा…“काहीही झालं तरी मला महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचंय”, शरद पवारांनी ठोकला शड्डू  

हेही वाचा..“अखेर सुनेत्रा पवारांसाठी काठेवाडीत गुलाल उधळला, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल 

हेही वाचा…विधानसभेच्या २०० ते २५० जागा मनसे स्वबळावर लढणार ? महायुतीची चिंता वाढली ?