अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणीवरून राजकारण तापत आहे. एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनात जाण्याला संविधानाच्या शपथेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
ओवेसींनी ट्विट करताना म्हटले आहे की, पंतप्रधान म्हणून भूमिपूजनात सहभागी होणे संविधानाच्या शपथेचे उल्लंघन आहे. धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानाचा मूलभूत पाया आहे. अयोध्येत ४०० वर्षांपर्यंत मशीद होती, हे आपण विसरू शकत नाही. १९९२ मध्ये ती पाडली. सरकारला कोणताही धर्म नसतो. या कार्यक्रमात पंतप्रधानांची उपस्थिती जखमा जिवंत करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.