पुणे : सध्या राज्यात महाविकास आघाडीतील नेते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करीत आहेत. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली की त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते नितेश राणे लगेचच पत्रकार परिषद घेऊन पलटवार करीत आहेत. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर देखील राष्ट्रवादीच्या नेत्यावर सातत्याने टिका करीत आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…“संजय राऊत हे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील,” भाजप आमदाराची राऊतांवर जहरी टिका
ज्याच्या तोंडातच नेहमी जहरच असतं. तो नेहमी जहरीच बोलणार. अलिकडच्या काळात पवार परिवारावर बोलण्यासाठी सुपारी घेतलेले बहाद्दर भाजपमध्ये आहेत. भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याबद्दल बोलायला सांगितलं आहे. म्हणजे त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…आपची ‘महाराष्ट्रात’ जोरदार धडक..! राज्यात ‘स्वराज्य यात्रेचं आयोजन, सहभागी होण्याचं मुयर दौंडकरांचं आवाहन
तसेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं राहिल्यानंतर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. त्यामुळे आपण बोलतो किती, आपला आवाक्का किती. ? तसेच कितीही जहरी टिका केली तरी जहर ओकणाऱ्याराला कॅबिनेट मध्ये स्थान नसेल. इतकी तरी भाजपमध्ये लाज शरम असेल. अशा लोकांना ते स्थान देणार नाही. तसेच नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून स्पर्धा लागली आहे. जितकी खालच्या पातळीवर टिका करणार. तेवढी खालच्या पातळीवर जाऊन टिका करणाराचा भाजपच्या आमदाराचा प्रयत्न आहे. विरोधकांवर टिका करा अन् मंत्रीपद मिळवा. असंही मिटकरींनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीसांना ‘मुख्यमंत्र्यांची’ गाडी चालवावी लागते, त्यांची दया, कीव येते”
हेही वाचा…गौतमीच्या आडनावावरून वाद, सुषमा अंधारेंची वादात उडी, माधूरी दिक्षीत, ममता कुलकर्णी अन् माधुरी पवारांचं नाव घेऊन…
हेही वाचा…“..तर मग टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ?” नितेश राणेंना रूपाली पटालांचा खोचक टोला
हेही वाचा…“भाजप ही अजगर, मगरीसारखी..!सोबत गेलेल्यांना भाजपाने खाऊन टाकले”
हेही वाचा…तयारीला लागा…! “पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरच लागणार,” अजित पवारांनी दिले संकेत