विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे आज वाढदिवस आहे. या निम्मिताने संपूर्ण राज्यभरातून त्यांच्या चाहत्यांकडून अनेक शुभेच्छा येत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज वाढदिवस साजरा करणार नाही असे दोघांनीही स्पष्ट केले आहे.
भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘फडणवीस ही तर महाराष्ट्राची गरज आहे’ असे म्हटले आहे. फडणवीस यांचे सरकार आणि महाविकास आघाडीचे सरकार यांची तुलना करत पडळकर यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी फडणवीसच हवेत, असेही म्हटले आहे. बारामतीत अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवलेले पडळकर पवार यांनाही शुभेच्छा देण्यास विसरलेले नाहीत! पडळकर यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.
पडळकर यांचे ट्विट –
”देवेंद्र यांनी अवघ्या पाच वर्षांच्या कालावधी राज्याच्या सर्वांगीण पातळीवर शाश्वत विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रानेही यावर दाद देत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केले. आजवरच्या सर्व प्रचलित राजकीय चौकटी मोडत महाराष्ट्राने विकासाभिमुख चेहऱ्याला कौल दिला. मात्र सत्तापिपासू पक्षाने सर्व नैतिकता बाजूला ठेवत अनैतिक आणि अनैसर्गिक आघाडी करत जनमताला तिलांजली वाहिली. असो, जे घडले, ते घडले’
‘.केवळ सत्ता हा एकच धागा पडकून स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे सरकार आणि देवेंद्रजींचे सरकार याची तुलना करताना महाराष्ट्राला फडणवीस यांची गरज अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. आताच्या सरकारमध्ये नसलेली एकवाक्यता, व्हिजनशिवाय सुरु असलेली वाटचाल, प्रशासकीय घटकांचा जास्तीचा प्रभाव आणि वेळोवेळी दिसून आलेली वैचारिक भिन्नता आज महाराष्ट्रासमोर आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना कोणतीही दिशा या सरकारला नाही……
……….आर्थिक गाडा रुळावर आणताना आणि कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या व्यवस्थेत विसंगती, विसंवाद आणि हेवेदावे स्पष्ट दिसत आहेत. एकीकडे ‘पुनःश्च हरी ओम’ म्हणायचं आणि पुनःश्च लॉकडाऊन करायचा यामुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार वर्ग मेटाकुटीला आला आहे. आज फडणवीस असते, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. याचे महत्वाचं कारण म्हणजे, देवेंद्रजींमध्ये संकटांचा सामना करण्यात असलेला हातखंडा’ असेही पडळकर म्हणाले.
“मध्यंतरीच्या कालावधीत मी देवेंद्रजींपासून दुरावलो होतो. पण त्याही काळात त्यांच्या नेतृत्वावर कधीही शंका उपस्थित करु शकलो नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात निर्माण झालेला आदर, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.
‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा!’ या फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेल्या शेरवर टिप्पणी करत पडळकर म्हणतात….. ‘होय देवेंद्रजी, तुम्ही समुद्राप्रमाणे विशाल मनाचे, विशाल कर्तृत्वाचे, विशाल दुरदर्शी असलेले नेते आहात. या महाराष्ट्राला आज तुमची गरज आहे, कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी.
मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस : गरज महाराष्ट्राची !
नव महाराष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना मांडत शाश्वत विकास कामांचा धडाका लावणारे राज्याचे प्रभावी, खमके आणि पारदर्शी मा. मुख्यमंत्री आणि संवेदनशील विरोधीपक्ष नेते मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! pic.twitter.com/zNp8A71K1O
— Gopichand Padalkar (@GopichandPBJP) July 22, 2020
महाराष्ट्र हिताचा विचार करत पुढे-पुढे जात राहिले. मोठमोठ्या आंदोलनांचा सन्मान करत यथोचित मार्ग काढताना राज्याचा समतोल राखत विकासाची गती त्यांनी कायम ठेवली. प्रशासनावर असलेली उत्तम पकड, दूरदर्शी भूमिका आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याची त्यांची सवय मला भावणारी आहे.
— Gopichand Padalkar (@GopichandPBJP) July 22, 2020
'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा!’ होय देवेंद्रजी, तुम्ही समुद्राप्रमाणे विशाल कर्तृत्वाचे नेते आहात. या महाराष्ट्राला आज तुमची गरज आहे, कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी !
— Gopichand Padalkar (@GopichandPBJP) July 22, 2020
पडळकर यांनी फडणवीस यांना शुभेच्छा तर दिल्याच मात्र बारामतीत अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढूनही ते वाढदि.वसाच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत. शुभेच्छा देताना त्यांनी अजितदादांना उत्तम आणि दीर्घायु लाभो, अशी सदिच्छाही व्यक्त केली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री. @AjitPawarSpeaks यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयु लाभो, ही आजच्या वाढदिवशी सदिच्छा !
— Gopichand Padalkar (@GopichandPBJP) July 22, 2020