मुंबई – महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १५ दिवसांपासून संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण करा अथवा संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी घेतली आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी बैठकांचा आणि चर्चांचा सपाटा लावला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एसटीच्या संघटनांसोबतच भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दर्शविला आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील अनेक दिवसांपासून आंदोलन कर्त्यांसोबत ठाण मांडून बसले आहेत.
डॉ. अतुल बाबा भोसलेंच्या साथीने सहकारमंत्र्यांनी उंडाळकरांचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
काल रात्री एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची महत्वाची बैठक पार पडली होती. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी आता जास्त न ताणता अंतरिम पगारवाढ या धोरणावर सध्या तरी समाधान मानावे आणि येणाऱ्या काळात न्यायालयाच्या निर्णयासाठी वाट बघावी असं मत परब यांनी मांडल होतं.
याला कर्मचाऱ्यांनी देखील सकारत्मक प्रतिसाद दिला होता. आज ११ वाजता राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांची पुन्हा एक महत्वाची बैठक होणार होती. बैठकीला निघणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आणि पडळकरांना, खोतांना आंदोलकांनी अडवलं आहे.
आटपाडी राडा प्रकरण भोवणार?; अटकेपासून वाचण्यासाठी पडळकरांची उच्च न्यायालयात धाव
”आमच्या आंदोलनाचे नेतृत्व तुम्हीच करा,” असं कर्मचाऱ्यांनी खोतांना आणि पडळकरांना म्हटलं आहे. यावेळी आंदोलकांना गोपीचंद पडळकर म्हणाले, ”आम्ही लबाडी करत नाहीत. आंदोलन सुरू ठेवणार असाल तर त्यांच्या सोबत तुम्ही जा. सरकार बरोबर चर्चा केली नाही तर तोडगा कसा निघेल. तुम्ही राज्यात आंदोलन करणाऱ्या तुमच्या कर्मचाऱ्यांशी बोला. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आमची तुमच्यावर जबरदस्ती नाही असं देखील पडळकर यावेळी म्हणाले आहेत.
मात्र आता जर या संपातून तोडगा काढायचा असेल तर राज्य सरकारशी चर्चा करणे अनिवार्य आहे. अन्यथा सामान्य जनतेला आणि सरकारला आपण वेठीस धरत आहोत अशी भावना निर्माण होऊ शकते असं देखील मत पडळकरांनी व्यक्त केलं आहे. आता पुढील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
Read Also :
- मनसे सोडणार असल्याच्या अफवा पक्षातील विरोधकांनीच रंगवल्या; रुपाली ठोंबरेनी सोडले मौन
- साताऱ्याच्या निकालाने राष्ट्रवादीत फुटीची चिन्हे; शशिकांत शिंदेंचे थेट संकेत
- एसटी संप आज मिटणार का? ११ वाजता राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार महत्वाची बैठक
- निलेश लंके लावणार अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह; पवार कुटुंबीय करणार कन्यादान
- साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…