सोलापूर : पंढरपूरमध्ये भाजपने राष्ट्रवादीला धूळ चारल्यानांतर, स्थानिक पातळीवर आता राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे. कारण, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी कासेगाव मध्ये पार पडला. त्यावेळी, नेते कल्याणराव काळे यांनी पक्षात सुरू असलेल्या गटबाजीविषयी नाराजी व्यक्त करत, “आचारी जास्त झाल्यानंतर जसा स्वयंपाक बिघडतो, तशीच अवस्था पंढरपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची झाली आहे,’ असा घरचा आहेर पक्षाला दिला.
गायिका म्हणून नव्हे तर, राजकीय नेत्याची बायको म्हणून लोक माझ्याकडे बघतात – अमृता फडणवीस
काळे म्हणाले, ‘आमचे विरोधक परिचारक व त्यांची कंपनी आहे. पण त्यांच्यावर टीका कोणी करत नाही. आपलेच लोक, पक्षातील कार्यकर्ते आमची मापे काढतात. CCTV प्रमाणे पाळत ठेवतात. दुष्काळामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत. पण विठ्ठल आणि वसंतराव काळे या दोनच साखर कारखान्यांविषयी लोकांमध्ये, ‘आम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवणार’, अशी चर्चा आहे. परिचारकांच्या कारखान्याविषयी न बोलता, आम्हालाच टार्गेट केले जात,’ असा आरोप त्यांनी केला.
मोठी बातमी: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा पुराव्यानिशी आरोप
तसेच, ‘या सगळ्यात राष्ट्रवादीचेच लोक आघाडीवर आहेत. आमच्या बायका देखील जितक्या आमच्यावर लक्ष देत नसतील, तेवढं लक्ष ही लोकं आमच्यावर ठेवून असतात, हे आपलेच लोक करतात. यावरून सध्या पक्षात नेते कमी अन् कारभारी जास्त झाले आहेत, हे दिसतंय,’ असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे, काळेंच्या या भाषणबाजीनंतर पंढरपूर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद आणखी उफाळून येण्याची शक्ता आहे. आता त्यांना राष्ट्रवादीचा दुसरा गट काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.
Read Also :
- ‘इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना तुमचा मुलगा काय करतो ते पाहा,’ मलिकांचा घणाघात
- साकीनाका बलात्कार: पीडितेच्या कुटूंबीयाला २० लाखाची मदत, अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल
- अनिल देशमुखांचा ठावठिकाणा लागावा म्हणून ईडीने उचलले मोठे पाऊल
- मुश्रीफ ठोकणार सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा, पाटील-घाटगेंनाही दिला इशारा
- १०० कोटीचा दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? – चंद्रकात पाटील