मुंबई : काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे ५ वाजता, पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटल मध्ये निधन झाले. २३ एप्रिल रोजी महामारीची लागण झाल्याचे निदान झाल्यावर त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, मात्र, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला आणि त्यांची प्रकृती खालावत जाऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, यानंतर त्यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत असून, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ट्विटर वर एक व्हिडीओ शेअर करून राजीव सातव यांना भावनिक होत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“सामान्य समाजासाठी धडपडणारा एक तरुण उमदा युवा नेता, राजीव सातव यांच्या रूपाने आज आपण गमावलेला आहे. सामान्य लोकांचे आशीर्वाद घेत घेत मोठा झालेला आणि एक राजकीय उंची गाठलेला आणि तरीही सामान्य जनतेशी नाळ जोडलेली असणारा एक सामान्यातला असामान्य नेता या क्रूर महामारीने आपल्यातून नेला आहे”, अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
“सातव परिवाराच्या दुःखामध्ये आज मुंडे परिवार सहभागी आहे. काँग्रेसने आज एक उमदा राजकारणी तर गमावला आहेच, पण आम्ही देखील मुंडे साहेबांचा साहेबांचा लाडका राजीव, लाडका युवक गमावला आहे”, अश्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या आहेत.
मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला… राजीव सातव सारख्या उमद्या तरुण बहुजन नेता बनण्यासाठी खूप कष्ट लागतात..#RajeevSatav pic.twitter.com/9OMIwM1hR3
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 16, 2021
Read Also :
- सातव यांच्या जाण्याने ‘मित्र गमवल्याची’ राहुल गांधीची भावना तर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
- राजकीय नेत्यांनी दिली समाज माध्यमांवरून, राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- जिथे जन्म तिथेच मृत्यू.! खासदार राजीव सातव यांचा 46 वर्षाचा प्रवास….!
- राज्याने गमावला अभ्यासू नेता, काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
- “शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?”; मोदींना संजय राऊतांचा सवाल