मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतर ५ अधिकाऱ्यांवर, मुंबईतील मरिन ड्राईव्ह आणि ठाण्यात कोपरीमधल्या पोलीस ठाण्यात, खंडणी मागितल्याप्रकरणी आणि फसवणुक केल्या प्रकरणी २ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड आज होत असून, या प्रकरणातील सर्व ५ अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या करण्यात आल्या आहेत.
ते ५ अधिकारी
पोलिस उपायुक्त (डीसीपी) अकबर पठाण
पोलिस उपायुक्त (डीसीपी EOW) पराग मानारे
सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) संजय पाटील
सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) श्रीकांत शिंदे
पोलिस निरीक्षक आशा कोंरके
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात केली गेली मोठी कारवाई
तसेच, परमबीर सिंग यांच्यावर दाखल केल्या गेलेल्या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडून, विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक करण्यात आली असून, त्याचे नेतृत्व डी.सी.पी. निमित गोयल करत आहेत, तर त्यांच्यासोबत या ७ सदस्यीय टीममध्ये, ए.सी.पी. आणि अन्य पाच निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.
Mumbai Police says it has formed a 7-member SIT headed by a DCP-level officer to probe the corruption charges against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh and 5 others pic.twitter.com/eZgTS3UxL4
— ANI (@ANI) July 28, 2021
एसआयटीमध्ये कोणाकोणाचा समावेश
निमित गोयल, पोलीस उपायुक्त
एम एम मुजावर, सहाय्यक पोलीस आयुक्त
प्रिणम परब, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
सचिन पुराणिक, पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक
विनय घोरपडे, पोलीस निरीक्षक
महेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाणे
काय आहेत प्रकरणं?
भाईंदरमधले बांधकाम व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्हच्या पोलिस ठाण्यात सिंग यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी, परमबीर सिंग आणि मुंबई पोलीस दलातील ५ अधिकाऱ्यांविरुद्ध १५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात देखील जुहू पोलीस स्टेशनमध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याची देखील चौकशी एसआयटीकडून केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली परमबीर सिंग यांची याचिका, नोंदवले महत्वाचे निरीक्षण
दुसरीकडे, सिंग यांनी २ कोटी रुपयांची खंडणी मागून, जमिनी बळजबरीने नावावर केल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, यातील सिंग यांच्यासोबतचे आरोपी संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.
Read Also :
- भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले देशपातळीवर प्रयत्न सुरु
- नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला; राहुल गांधीचा पेगाससवरून हल्लाबोल
- “फडणवीसांनी उठसूठ बोलण्यापेक्षा अभ्यास आणि संशोधन करून बोलावं”
- नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरणाचा झाला उलगडा; हाय सिक्युरिटी असूनही गेल्या होत्या ५ लाखांच्या नोटा चोरीला
- मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना देणार मोठा दिलासा