अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका आडिओ क्लिपने सध्या अहमदनगर जिल्हा आणि राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यात दिला आहे. यामध्ये त्यांनी थेट कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या बोलण्यातून रोख हा स्थानिक आमदार निलेश लंकेकडे असल्याचे दिसून येत आहे, तर निलेश लंकेंनीही उलट ज्योती देवरेंवर आरोप केले आहेत.
“सण -वार, उत्सव बाजूला ठेऊन कोरोनाला हद्दपार करू,” मुख्यमंत्र्यांचे गोविंदा पथकांना आवाहन
दरम्यान, तीन दिवस गायब राहिल्यांनंतर आता, त्या’ ऑडिओ क्लिपवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मौन सोडलं असून, आज माध्यमांसमोर येऊन त्यांनी, “ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, केलेलं लिखाण हे मानसिक उद्वेगातून केले आहे आणि नंतर त्याची ऑडिओ क्लिप तयार केली. मात्र ही क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल झाली,” असा दावा त्यांनी केला आहे. “त्यामुळे आणखीन डिप्रेशन येऊन २ दिवस फोन बंद ठेवला, मात्र आता मी पूर्णपणे स्टेबल आहे,” असं त्यांनी सांगितलं.
ऑडिओ किल्पमध्ये काय आहे?
प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईट नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावलं होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालूपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आताा त्राण राहिले नाही.
“पारनेरच्या तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो…”, अण्णा हजारेंचा ज्योती देवरेंना सल्ला
तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.
“… तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे मागू ,” भाई जगतापांचा नितीन राऊतांना इशारा
दुसरीकडे, ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, तहसीलदार देवरे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. याबाबतचा चौकशी अहवाल आता अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, त्यात देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.
Read Also :
- “१२ कोटी जनतेला विचारा उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?” बावनकुळेंचे ठाकरे सरकारला आव्हान
- देशमुखांवर अटकेची टांगती तलवार! ईडीकडून केली गेली पुन्हा मोठी कारवाई
- महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे – देवेंद्र फडणवीस
- “भुजबळ संपल्यात जमा; मुख्यमंत्र्यांना कायमचंच घरी बसवू,” नारायण राणेंचा हल्लाबोल
- छगन भुजबळ अचानक दिल्लीला रवाना; देशातील बड्या वकीलाची घेणार भेट