पुणे । विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदार संघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून मोर्चेबांधणी केली जात असून, स्थानिक कार्यकर्त्यांनी पार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी केली आहे.
पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. हा मतदार संघ राष्ट्रवादीसाठी मोठा आव्हानात्मक होता. मतदार संघात पुरेशी ताकद नसतानाही पार्थ यांनी निवडणूक लढवण्याची जोखीम घेतली होती. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तगडे आव्हान दिले होते. पिंपरी आणि चिंचवड अशा दोन मतदार संघामधून पार्थ यांना मताधिक्य घडले. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री”, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टिका
दुसरीकडे, पवार कुटुंबियांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करीत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर डॉ. कोल्हे आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये खटके उडाल्याचे पहायला मिळाले. डॉ. कोल्हे यांना स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा विरोध आहे, अशी चर्चा आहे.
दरम्यान, ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. कोल्हे यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांशी जवळीक केल्याचा आरोप होवू लागला. त्यानंतर ‘शिव प्रताप गरूडझेप’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भाजपाचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी वाढलेला सलोखा डॉ. कोल्हे यांच्याप्रति राष्ट्रवादीत अविश्वास निर्माण करणारा ठरला आहे.
हेही वाचा…“अमृता फडणवीसांना लाच देणारे बुकी अनिल जयसिंघानी अन् त्याची मुलगी अनिक्षा, हिची समारोसमोर चौकशी होणार”
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमांपासून दूर आहेत. तसेच, संघटनात्मक कार्यक्रमांमध्येसुद्धा डॉ. कोल्हे यांनी अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते. नुकत्याच झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादीचा प्रचार करताना डॉ. कोल्हे दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून डॉ. कोल्हे यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जातो का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिरुर मतदार संघ राष्ट्रवादीसाठी अनुकूल…
पार्थ पवार यांचे राजकीय ‘रिलॉन्च’ करण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. त्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मदतीने शिरुरमध्ये पार्थ पवार यांना मैदानात उतरवण्यात येईल. वास्तविक, शिरुरमधील हडपसर, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरुर अशा सहा पैकी पाच विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. केवळ भोसरी मतदार संघात भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर राष्ट्रवादीसाठी सहज जिंकता येईल, असा मतदार संघ आहे. स्थानिक नेत्यांचा डॉ. कोल्हे यांना होणारा विरोध आणि शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. कोल्हे यांच्यातील मोठी स्पर्धात या वादात पार्थ पवार राष्ट्रवादीच्या तिकीटावर बाजी मारतील, असे गणित आखण्यात आले आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने (२१ मार्च) शिरुर मतदार संघातील प्रमुख ठिकाणी पार्थ पवार यांच्या अभिष्ठचिंतनाचे बॅनर लागले आहेत. आता डॉ. कोल्हे की पार्थ नेमके कुणाला उमेदवारी मिळणार की पार्थ पवार रिंगणात उतरणाच नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
- हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
- हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
- हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल
- हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला