जळगाव लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रकारचे लहान दुकानदार, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले ,चहा ,अंडी , भजी, खाद्य प्रदार्थ विक्रेते, कापड, लॉंड्री दुकानदार, चर्मकार या सारख्या असंख्य दुकानदारांना कोरोनाच्या पादुर्भावामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा घटकांना सर्वाधिक आर्थिक झळ बसलेली आहे. या परीस्थितीची केंद्र सरकारला जाणीव आहे. म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीची घोषणा केली आहे. यामुळे पथविक्रेतांना आपला व्यवसाय पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी द्वारे पथविक्रेत्याला खेळते भांडवल म्हणून १०००० रुपये मिळणार आहे. या निधीचा फायदा घेण्यासाठी नगरपरिषेदेचे तात्पुरता विक्री प्रमाणपत्र, आधार कार्ड ,रेशन कार्ड , वाहन परवाना ( असल्यास ) बँक पासबुकची झेरॉक्स , स्वतःचा फोटो , आधार लिंक असलेला मोबाईल नंबर इत्यादी अवश्य असणारे कागदपत्र आपल्या शहरातील जवळचे ई-सेवा केंद्रात नाव नोंदणी करावी. या योजनेत १०००० रुपये विनातारण खेळते भांडवल मिळेल. नियमित हप्ते भरल्यास व्याजात 7 टक्के सूट मिळेल. व पुढच्या मोठ्या भांडवलाची हमी मिळेल तसेच डिजिटल व्यवहार केल्यास १२०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.या योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री.उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांनी केले आहे.