बारामती : शरद पवार गटातील युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली अलिकडेच माळेगाव सहकारी साखरखान्यावर जागरण गोंधळ काढण्यात आले. चालू हंगामातही संचालक मंडळाने शेतकऱ्यांवर अन्याय केला असे म्हणत त्यांनी प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधत युगेंद्र पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी साखर कारखान्याचा मागील लेखाजोगा देखील मांडला.
हेही वाचा…बीडच्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे पवारांचाही हातभार ; अंजली दमानियांचा जोरदार पलटवार
यावेळी जगताप म्हणाले की, माळेगावने शेतकऱ्यांना राज्या प्रथम क्रमांकाच गतवर्षी ३६३६ अंतिम उस दर दिला होता. चालू हंगामातही माळेगावचे प्रतिटन ३१३२ रूपये सर्वाधिक अडव्हांस जाहीर केला. जून ते जुलैमध्ये खोडकी पेमेंट प्रतिटन २०० रूपये देण्याचे नियोजन आहे. परिणामी पवार साहेब अध्यक्ष असलेल्या व्हीएसआय संस्थेने माळेगाव प्रशासनाला उत्कृष्ट आर्थिक नियोजनचा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला व सन्मानित केले. अशा माळेगाव कारखान्यावर युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस दरासाठी जागरण गोंधळ आंदोलन केले हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा…कार्यकर्त्यांची पोलिकांकडून धरपकड, राजू शेट्टींच्या घरी पोहचला पोलिसांचा ताफा
जगताप यांनी सांगितले की, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात ऊसाची रिकव्हरी १३ टक्क्यांहून अधिक आहे, तर माळेगावच्या भागात ती १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तरीही माळेगावने राज्यातील सर्वाधिक ऊस दर दिला आहे. युगेंद्र पवार यांनी स्वतःच्या शरयू कारखान्याने गेल्या १० वर्षांत दिलेल्या ऊस दराचा लेखाजोखा द्यावा आणि आत्मपरीक्षण करावे, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना जगताप म्हणाले की, बारामती आणि फलटण तालुक्यातील अनेक कारखान्यांचे दूषित पाणी नदीत सोडले जाते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, माळेगावने प्रदूषणमुक्तीसाठी ईटीपी प्रकल्प उभारला असून, आणखी आधुनिक तंत्रज्ञान बसविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहेत. मात्र, माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यांचे गाळप अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू आहे. माळेगाव कारखान्याने आतापर्यंत १०.६० लाख टन ऊसाचे गाळप केले असून, अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शेतकऱ्यांकडून माळेगावला पाठविला जात आहे. या पार्श्वभूमीवर कारभार चुकीचा असता, तर शेतकरी माळेगावला ऊस देण्यासाठी पुढे आले असते का, असा प्रश्नही जगताप यांनी उपस्थित केला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी योग्य ठिकाणी आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा…धनंजय मुंडेंची सहा महिन्यात आमदारकीही जाणार, करूणा मुंडेंचा मोठा दावा
श्रावणी बाळा..!’या नालायक राक्षस लोकांनी ; मुंडेंचा उल्लेख करत शिक्षकाने उचचलं टोकाचं पाऊल
हेही वाचा…महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात ; संघटनेकडून रोहित पवारांना सवाल