IMPIMP

बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात पवारांनी २० तरूण हेरले ; परळी, बारामती, कागल ते दिंडोरीत धक्का देणार ?

Pawar spies 20 youths

मुंबई : राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली. अजित पवारांसह राष्ट्रवादीमधील अनेक प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली. परंतु पवारांनी पुन्हा मैदानात उतरून पक्ष संघटना मजबूत केली. यातच अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत एकूण दहा उमेदवारांपैकी शरद पवार यांनी तब्बल ०८ उमेदवार निवडून आणलेत. यातील बहुतांश उमेदवार तरूण आणि नवखे होते. यातच आता शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असून जवळपास २० मतदारसंघात तरूण नेत्यांना संधी दिली जाईल अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा..“एक तर तु राहशील, नाहीतर मी राहीन”, उद्धव ठाकरे संतापले, कुणाला दिला इशारा ? 

पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवार गटाने मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केलीय. यातच अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात तरूण उमेदवारांना उतरविण्याच्या हालचाली शरद पवार गटात सुरू झाल्या आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, या मतदारसंघात तरूण नेत्यांना संधी दिली जाईल. अशी चर्चा आता शरद पवार गटात सुरू झाली आहे.

अजित पवार गटात सध्या अहेरीत आमदार धर्माराव बाबा आत्राम आमदार आहेत. आष्टीत बाळासाहेब आसबे, दिंडोरीत नरहरी झिरवळ, गेवराईत भाजपचा आमदार आहे. श्रीवर्धन मध्ये अजित पवार गटातील अदिती तटकरे, हडपसरमध्ये आमदार चेतन तुपे आमदार आहेत. पुसदमध्ये इंद्रनील नाईक, बारामतीत अजित पवार, अमळनेर मध्ये अनिल पाटील, उदगीरमध्ये संजय बनसोडे, अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक, परळीत धनंजय मुंडे, कागलमध्ये हसन मुश्रीफ, आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील, मावळात सुनील शेळके, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे, तुमसरमध्ये राजू कोरमारे, फलटणमध्ये दिपक चव्हाण, वडगाव शेरीत सुनील टिंगरे आमदार आहेत. या सर्व मतदारसंघावर शरद पवारांचं सध्या लक्ष्य आहेत.

हेही वाचा..“मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उद्धव ठाकरेच”, भाजपची ठाकरेंवर जहरी टिका

विशेष म्हणजे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचे दौरे देखील सुरू केले आहेत. अशातच तासगावात रोहित पाटलांची तसेच अकोल्यात अमित भांगरे यांच्या उमेदवारीचे संकेत देखील पवारांनी त्या त्या मतदारसंघात जाऊन दिले आहेत. यातच दिंडोरीत गोकुळ झिरवळ यांची चर्चा आहे. तर आष्टीत मेहबुब शेख, बारामतीत अजित दादांच्या विरोधात युगेंद्र पवार, खेड-आळंदीत दिलीप मोहिते पाटलांच्या विरोधात अतुल देशमुख, वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम अशा तरूण उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आहेत.

READ ALSO :

हेही वाचा..“तुम्हाला जळी, स्थळी, पाषाणी केवळ उद्धव ठाकरे दिसतात”, इतना डर होना भी चाहिए..! 

हेही वाचा…यंदा माधुरीताईंचं तिकीट कापणार? श्रीनाथ भीमाले भाजपकडून स्ट्रॉंग उमेदवार.!

हेही वाचा..मुख्यमंत्री शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ हुकूमी एक्का स्वगृही परतला 

हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील” 

हेही वाचा..माढ्यात दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात झुंजणार ? शरद पवारांची मोठी खेळी 

 

Total
0
Shares
Previous Article
Chandrashekhar Bawankule vs Uddhav Thackeray

"तुम्हाला जळी, स्थळी, पाषाणी केवळ उद्धव ठाकरे दिसतात", इतना डर होना भी चाहिए..!

Next Article
Uddhav Thackeray

विधानसभा निवडणुका ठाकरे गट 'या' चिन्हावर लढणार ? निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Related Posts
Total
0
Share