सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेत शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचं काम केल्याने त्यांचं आडनाव आगलावे करा, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते यावर काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचे काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आडनाव आता आगलावे करावे, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. ज्याठिकाणी जातील त्याठिकाणी फक्त आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचं इतकंच काम केलं आहे. असं म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे असं आवाहन देखील केलं आहे.
मग का प्रकरणाला उकळी देण्याचं काम करता? अजित पवार जाधव प्रकरणावरून भडकले
सोलापुर दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकरी मेळाव्या दरम्यान शरद पवारांना बद्दल वक्तव्य केलं आहे. दरम्यान, पवार म्हणाले होते की रशिया आणि युक्रेन संघर्ष सुरू आहे. तेथील विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आहे. तिथे आपली आठ दिवसांपासून मुलं भुयारात बसले आहे. त्यांना बाहेर पडता येत नाही. केंद्र सरकारने काही पावलं टाकावित तेथे आम्ही सोबत आहोत. तेथे आम्ही राजकारण आणणार नाहीत. तेथील मुलांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत आहे.
आमच्या मांडीला मांडी लावून बसले अन् आमची घडी..; सेनेच्या नेत्याचा काॅंग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा
त्याचबरोबर शरद पवारांनी देवेंद्र फडणीवांसावर केलेल्या टिकेवर सदाभाऊ खोतांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना मी येऊ दिलं नाही. मात्र येणारे येतीलच पण पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नसल्याचीही टीका सदाभाऊंनी केली होती.
Read also:
- सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांचा तडफडेचा ‘हा’ आवाज! नाना पटोलेंची भाजपवर जहरी टिका
- कोल्हापूर उत्तरेत भाजपची प्रचार आघाडी; वाघाची तालीम सदस्यांचा भाजपला पाठींबा जाहीर
- आमदार संदीप क्षीरसागरांची ‘झिंग कार्यपद्धती’ निष्क्रिय; क्षीरसागरांवर शिवसेनेची बोचरी टीका
- आमदारांना 300 घर बांधणार असल्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- महाराष्ट्राला वेठीस धरू नका; एक पाऊल तुम्ही पुढं या एक पाऊल आम्ही येतो: ऊर्जामंत्री नितीन राऊत