सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी ठाकरे सरकारची अवस्था झाली – प्रीतम मुंडे
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. मात्र, पक्षाचेच बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्यामुळं त्यांना एका मतानं पराभव पत्करावा लागला. त्यामुळं संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिंदे यांना मदत झाली नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शशिकांत शिंदे यांनी मात्र ही सगळी चर्चा फेटाळून लावली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांमुळंच माझी राजकीय ओळख आहे. कालच्या निवडणुकीत स्वत: शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही गोष्टी वेगळ्या घडल्या. आम्ही गाफील राहिलो, त्याचा फटका बसला, असं शिंदे म्हणाले. ‘कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चुकीचं कृत्य झालं आहे. त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असंही शिंदे म्हणाले.
सरकारचं मंत्रालय बंद, दुकानदारी मात्र सुरू, महत्त्वाचे मंत्रीच भ्रष्टाचाराने बरबटलेतं – पंकजा मुंडे
ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली. ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावरही राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. याच कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्याकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर साताऱ्यात तणाव पाहायला मिळत आहे.
Read Also :
- पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत
- अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचा राडा; शाई फेकण्याचा प्रयत्न
- शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, नुस्त खेळवत ठेवतात; नारायण राणेंचा घणाघात
- पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?
- ‘ओह माय गॉड! क्रांती जी’ म्हणत मलिकांनी क्रांती रेडेकरांचे चॅट केले व्हायरल; चॅटमध्ये होते ‘हे’ गुपित